Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये ओरिगामी प्रदर्शन संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये ओरिगामी प्रदर्शन संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी

अलिबाग: (दि ५ फेब्रुवारी): जर तुम्ही वस्तु संग्रहालयापर्यत येऊ शकत नसाल तर वस्तुसंग्रहालय तुमच्यापर्यंत येईल. या उक्ती प्रमाणे मंगळवार दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई यांच्यामार्फत फिरते म्युझियम संपर्क अभियान या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ओरिगामी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये अत्याधुनिक साधनांनी युक्त अशा बसमध्ये कागदापासून बनविलेल्या अतिशय सुंदर अशा विविध प्रकारच्या कलाकृतींची मांडणी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी या कलाकृती पाहण्याचा आनंद घेतला. तसेच याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई यांच्या लोकायत हलकारे, प्रदिप नळेकर, काश्यपी राणे, रेशन गुढेकर या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कागदापासून विविध कलाकृती बनवण्यासाठी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दाखविली.

विद्यालयात हा उपक्रम राबविल्याबद्दल मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई यांचे व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे