दलितांचा राजा
होता भीमराव माझा, दलितांचा राजा
चहूमुलखी गाजतो जगात गाजावाजा
भीमराया केले आमच्या जीवनाचे सोने
फुलले नंदनवन होते ओसाड माळराने
तुझ्या कार्य कर्तुत्वाने,झालो मालामाल
धनवान केले आम्हां,होते जे जे कंगाल
कवडीमोल जिने, नव्हता मुळीचं भाव
आठराविश्र्व दारिद्रय,रंकाला केले राव
ज्ञानाची शिदोरी,दिली अशी भरभरून
सरता सरत नाहीचं,उरते वाटून वाटून
ज्ञानामृत पाजूनी ,बाळकडू शिक्षणाचे
हक्क अधिकार बहाल केले मानवतेचे
क्रांतीसूर्य ज्ञानसूर्य घटनेचा शिल्पकार
वंचित शोषित दलितांवर थोर उपकार
केले जीवाचे रान,पर्वा नाही जीवाची
सतत वाहिली काळजी पद दलितांची
सहा डिसेंबर छप्पन साली काळराती
वैरीण भीमाची मावळली प्राणज्योती
सूर्य लोपला दिन दलितांचा भुवरती
गहीवरला सागर,दर्यास आली भरती
विनम्र अभिवादन करतो बा’भीमाला
लाखोंचा जनसागर किनारी उसळला
बी एस गायकवाड
पालम, परभणी
========



