Breaking
कवितामराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

राजश्री मिसाळ ढाकणे

गुरुवर्य; राजश्री मिसाळ ढाकणे

0 4 8 2 7 5

गुरुवर्य

प्रश्न पडतो मनाला नेहमी
नसते लाभले गुरुवर्य जर
अज्ञानाच्या कुट्ट काळोखाने
ग्रासला असता जीवनस्तर…!!

डोळे असून अंधासारखी
कळली नसती बसची पाटी
रोजच्या व्यवहारातही मग
सर्वत्र समस्यांचीच दाटी…!!

इच्छा असूनही मग मी
नसते वाचले पुस्तक
ज्ञान मिळाले नाही तर
सुधारले असते का मस्तक…!!

शिक्षणाविना नोकरी कुठली
कायमची आर्थिक ओढाताण
ज्ञानाअभावी नाहीच मिळत
समाजात कोणाला मानपान…!!

गुरुवर्य चरणी नतमस्तक
ब्रम्हा विष्णु महेश्वर तुम्ही
शिल्पकार देश स्तंभाचे
कृतज्ञ आजन्म राहू आम्ही…!!

राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड
============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 7 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे