आंरिमोतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राचे अनावरण
नागपूर शहर प्रतीनिधी
आंरिमोतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राचे अनावरण
नागपूर शहर प्रतीनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर (दि.१९ – २०२६) रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या विरोधाचा बदला घेवून पुरोगामी विचारसरणीची पकड घट्ट केली हेच विचार रयतेला कळले पाहिजे म्हणून जिथे शिवाजी तिथे डॉ. आंबेडकर हे मिशन चालवण्याचे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा ने संकल्प केला आहे.
याप्रसंगी आंरिमो चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण केले. प्रा. रमेश दुपारे यांनी दिपप्रज्वलन केले. कार्यक्रमात चरणदास गायकवाड, राजु दादा पांजरे, सुरज ढोणे, पुण्यशील बोदिले, अभिषेक मिश्रा, हंसराज उरकुडे, रोहित पांडे, राहुल द्विवेदी उपस्थित होते.



