0
4
8
2
8
7
नारीशक्ती
सोसिक अबला होवून
किती दिवस जगायचे?
दुःखाचे आवांढे गिळून
किती आश्रू लपवायचे?
स्वअस्तित्व ओळखून
जागृत कर,निद्रिस्त शक्तीला,
आदीमाया,आदीशक्ती तू,
आव्हान दे,स्वयंभू कर्तृत्वाला
कर्तृत्व तुझे,स्वयंभू आहे
ज्ञानाची प्रकाड,पंडित आहेस,
नेतृत्व तुझे,सर्वसमावेक
विश्वाची,मायमाऊली आहेस.
शिकवण जिजाऊ सावित्रीची
जाण,अन्यायाच्या प्रतिकारची,
तूझ्या,हक्क कर्तव्याच्या लढाईची
सुरुवात मात्र,तुलाच आहे करायची.
आव्हाने संकटे येतात, जातात
संयमाची घेतात परीक्षा,
परिस्थितीशी दोन हात करून
पूर्ण कर तुझी अधुरी आकांक्षा.
नारीशक्ती, विकसित करू
एकमेकींना, साथ देवू,
नकारात्मक, प्रसंगाचे चिंतन करून
आत्मतेजाचा,प्रकाश,घेऊ देवू.
मायादेवी गायकवाड
मानवत परभणी
0
4
8
2
8
7



