
0
4
8
2
9
0
पावसाच्या सरी
झेलू चला अंगावर
पावसाच्या गार सरी
आसुसले तन मन
थेंब घेऊ देहावरी
तापलेल्या धरणीला
गारव्याचा स्पर्श छान
नाचू लागे मनमोर
विसरून देहभान
आनंदाचा क्षण गोड
नभ धरणीची प्रीती
ओलेचिंब मातीगंध
वाटे मनमोही किती
काया मोहरुन सृष्टी
होई नव्याने तरुण
रूप सुंदर हिरवे
कसे वर्णू तिचे गुण?
पावसाच्या सरी छान
अनुभवू अंगणात
चैतन्याची अनुभूती
मनी नवख्या क्षणात
सचिन पाटील
अलिबाग रायगड
0
4
8
2
9
0



