0
4
0
9
0
3
संगनमत
चिंटू, पिंटू,मिंटू झाले जमा
शाळेच्या आवारात
सोनी, मोनी, राणी
पाठोपाठ आल्या धावत
एकमेकाशी संगनमत करून
हातात हात घालून रिंकण केले
आजपासून पर्यावरणाच्या
रक्षणार्थाचा संकल्प हाती घेतले
चिंटू, पिंटू,मिंटूने आणले
अशोक, गुलमोहर, कडूनिंबाची
शाळेच्या आवारात एक एक रोपटे लावून
प्राणी,पशुपक्षासाठी सोय करू सावलीची
सोनी, मोनी, राणीने आणले
गुलाब, जाई, जुई ,शेवंती
ईकडून तिकडे फुलपाखरे
बघा कसे गुणगुणती
प्रदुषणाला आळा घालण्या
परिसर शोभिवंत करूया
पर्यावरण रक्षणाचे महान
कार्य चला हाती घेऊया
सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया
======
0
4
0
9
0
3





