0
4
8
2
8
6
महापूर
एका काळ्या रातीला
धो धो पाऊस झाला
डोळ्यातील स्वप्नांना
चोरून दूर पडून गेला
शेतीवाडी सारीच
पाण्याखाली गेली
शेजारची म्हातारी
खाट बुडून मेली
अन्न ,धान्य, वसन
सारे झाले ओलेचिंब
आडवा निजला दारी
अंगणातील कडुनिंब
भांडी – कुंडी सारीच
वाहून गेली पुरात
भविष्याच्या विचार
धडकी देई उरात
आठ दिस पाण्यात
पोहत होता गाव
विस्कटून गेला सर्व
महापूर त्याचे नाव
सौ वनिता गभणे
आसगाव भंडारा
==========
0
4
8
2
8
6



