अभ्यास माझा; विषय: विज्ञान
प्रश्न १ ला : वनस्पती तेलाचे क्षपण केले की त्यापासून वनस्पती तूप मिळते या अभिक्रियेत कोण उत्प्रेरकाचे कार्य करते ?
१) मॅगनिज डायऑक्साईड
२) रेनी निकेल✅
३) मॅग्नेशियम अयोडाईड
४) यापैकी नाही
प्रश्न २ रा : पेशी हे नाव प्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने वापरात आणले ?
१) रॉबर्ट हुक✅
२) थिओडोर
३) अलेक्झांडर फ्लेमिंग
४) रॉबर्ट ब्राऊन
प्रश्न ३ रा :भारतामध्ये राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली ?
१) १९९५
२) १९८७✅
३) १९९०
४) १९९४
प्रश्न ४ था : ड्रिल मशीन बगिच्यात वापरावी लागणारी यंत्रे यात कोणता विद्युत घट वापरतात ?
१) लेकलॅशे विद्युत घट
२) कोरडा विद्युत घट
३) निकेल – कॅडमिअम घट✅
४) साधा विद्युत घट
प्रश्न ५ वा : लोखंडाचा द्रवणांक व उत्कलनांक किती ?
१) १५३५ अंश सेल्सिअस आणि २७५० अंश सेल्सिअस✅
२) १५३५ अंश सेल्सिअस आणि ३७५० अंश सेल्सिअस
३) २७५० अंश सेल्सिअस आणि ३७५० अंश सेल्सिअस
४) १६३५ अंश सेल्सिअस आणि २७५० अंश सेल्सिअस
प्रश्न ६ वा : पदार्थाच्या उत्कलनांकानुसार त्याचा चढता क्रम लावा .
१) डिझेल , पेट्रोल , नॅपथॅलिन , केरोसीन
२) पेट्रोल , नॅपथॅलिन , केरोसीन , डिझेल
३) डिझेल , नॅपथॅलिन , केरोसीन , पेट्रोल
४) डिझेल , केरोसीन , नॅपथॅलिन , पेट्रोल✅
प्रश्न ७ वा : १८ कॅरेट सोन्यामध्ये किती टक्के सोने असते ?
१) ९१.८%
२) ७५%✅
३) ५८.५%
४) ७०%
प्रश्न ८ वा : जहाजाच्या पत्र्याचे क्षरण थांबवण्यासाठी त्यावर एनमलचा रंग लावतात त्यात कोणत्या धातूंचा वापर करतात ?
१) तांबे व कथिल
२) तांबे व जस्त
३) जस्त व मॅग्नेशियम✅
४) जस्त व अॅल्युमिनियम
प्रश्न ९ वा : कार्बनच्या टक्केवारी नुसार सर्वात अशुद्ध कोळशाचा प्रकार कोणता ?
१) पीट✅
२) लिग्नाइट
३) बिटूमिनस
४) अँथ्रासाइट
प्रश्न १० वा : कार्बन डायऑक्साईड किती तापमानापर्यंत थंड केल्यास त्याला शुष्क कोरडा बर्फ म्हणतात ?
१) -३० अंश सेल्सिअस
२) -५७ अंश सेल्सिअस✅
३) -३५ अंश सेल्सिअस
४) -१४ अंश सेल्सिअस
संकलन/सहप्रशासक
श्री. अशोक गंगाधर लांडगे
ता.नेवासा जि.अहमदनगर
=========



