अलिबागई-पेपरकविताकोकणनागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
देवा तुझ्या येण्याने
पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे
0
4
8
2
9
7
देवा तुझ्या येण्याने
देवा तुझ्या येण्याने
लाभला आम्हा सहवास
चैतन्यमय दान मिळाले
घेतला मांगल्याचा वास
तुझ्या सोबतीनेच देवा
झाली प्रसन्न सांजसकाळ
धूपदीप नैवेद्याचा पसरला
चोहिकडे सुगंध दरवळ
तुझी आराधना केली
आम्ही अगदी मनापासून
तुझ्या येण्यानेच घरात
घरपण शोभले तेव्हापासून
तू आलास अन् झाली
दूर चिंता व्यथा मनाची
तुझ्याच कृपाशिर्वादाने
उधळली सुमने आनंदाची
असाच पाठीशी रहा बाप्पा
लाभू दे नेहमीच आम्हा हर्ष
आमच्या घरी येत रहा तू
जरी उलटली वर्षानुवर्ष
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे
==========
0
4
8
2
9
7



