
0
4
8
2
5
1
अरे बापरे
अरे बापरे, अरे बापरे
पहिला तास कवायतीचा
पाय तर माझा लचकला
आधीच कंटाळा व्यायामाचा
अरे बापरे अरे बापरे
दुसरा तास मराठीचा
कविता तालासुरात म्हणायच्या
क्षण वाटे तो आनंदाचा
अरे बापरे अरे बापरे
तिसरा तास गणिताचा
पाढे सगळे झाले पाठ
कंटाळा येईना भागाकाराचा
अरे बापरे अरे बापरे
चौथा तास इंग्रजीचा
इंग्रजीतच संभाषण सारे
बाईंचा सल्ला मोलाचा
अरे बापरे अरे बापरे
पाचवा तास कलेचा
मजा वाटे आम्हाला
करण्या अभिनय विविध प्रकारचा
मीनाक्षी काटकर
दारव्हा, जि.यवतमाळ
0
4
8
2
5
1



