Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरमराठवाडासाहित्यगंध

समाजमन

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 4 8 2 8 4

समाजमन

पारखावे तरी कसे
समाजमनाचे गुपित
कळेना काय दडलय
समाजमनाच्या कुपित…//

मर्जी राखून जगावे तर
आवड निवड मातीमोल
चाकोरीबाहेर जायचे तर
टिका टिपणी विषारी बोल…//

अलिखित संकेतांचीही
असते नैतिक जबाबदारी
सामाजिक मान मर्यादांची
कशी ओलांडून जावे पायरी…//

सारासार विवेकबुद्धीने
करावा सर्वांगीण विचार
समाजमनाचा आदर कदर
सभ्यतेचा हवा आचार उच्चार…//

वैचारिक परिपक्वतेचे
जेथे तेथे व्हावे आचरण
नवी चाकोरी जरुन पाडावी
ज्याचे व्हायला हवे अनुकरण… //

विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे