
0
4
8
2
9
7
‘सत्ता’मेव जयते
सत्ता पिपासू वृत्ती झालीय
लालसा लागली उपभोगाची
साम, दाम, दंड, भेद प्रसंगी
काहीही करून मिळवायची
सत्तेचा भत्ता खाण्यासाठी
आसुरले सत्तेत जाण्यासाठी
कोणाची युती महायुती होई
सर्व काही चाले स्वार्थासाठी
पक्षांतर करून सोई नुसार
साधून घेतील आपला डाव
राजकारणी भले चतुर मोठे
लागू देईनात अंतरीचा ठाव
आपल्याच हातात पूर्वापार
सत्ता चालत राहावी म्हणून
वंशज ऊभे करून स्वतःचे
घराणेशाही आनी निवडून
युती कराय इथं समविचारी
पक्षाची गरज मुळीच नाही
‘सत्ता’मेव जयते ब्रीद वाक्य
यांची एकमुखी गर्जना राही
बी एस गायकवाड
पालम,परभणी
0
4
8
2
9
7



