0
4
8
2
8
4
मैत्री
सुगंधापरी सैरभैर दरवळणारी यारी,
जगात सर्वांत भारी दोस्ती प्यारी
वाळवंटापरी सुकल्या मनाला फुलवणारी,
मैत्रीच्या नात्याला माळेत गुंफणारी
फुलाप्रमाणे मनसोक्त हवेत डोलणारी,
फुलपाखरु बसले तरी गर्व न करणारी
गजबजल्या गर्दीत तुझं माझं न मानणारी,
मैत्री ही सर्वांना सामावुन घेणारी
फुलाच्या सौदर्यापरी सतत झळकणारी,
आनंदाची बहार मात्र वाटणारी
न होता आले सुगंधी अत्तर जरी,
मैत्रीत आपुलकीची साथ देणारी
काटे अवीभवती तरी फुलणारी,
दुःखाला सुखाची फुंकर घालणारी
माळरानावरचे फुल सुगंधी बनणारी,
मैत्री युगानु युगे टिकणारी
सचिन दळवी, बुलढाणा
0
4
8
2
8
4



