Breaking
अलिबागअहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनचंद्रपूरदादरा नगर हवेलीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध

मराठी साहित्यातील मोलाचे काव्यपान,’स्नेहवलय’ कवितासंग्रह

'स्नेहवलय' काव्यसंग्रहावरील वाचक अभिप्राय

0 4 8 2 8 6

मराठी साहित्यातील मोलाचे काव्यपान,’स्नेहवलय’ कवितासंग्रह

स्नेहवलय’ काव्यसंग्रहावरील वाचक अभिप्राय

खानदेशातील प्रसिद्ध कवी ‘स्नेहवलय’कार श्री गणेश पाटील सर यांना सप्रेम नमस्कार !

स्नेहवलय’ हा आपला पहिलाच पण दर्जेदार कविता संग्रह! ७२ पानी पुस्तकातील ६२ पानातील ५४ कविता काल दिनांक ११:७:२०२४ रोजी एकाच बैठकित वाचून काढल्या. मुखपृष्ठ,मलपृष्ठ,आतील पांढरा शुभ्र कागदावर उत्तम छपाई! एकंदरीत बाह्यांग इतकं उत्कृष्ट आहे की पाहिल्या बरोबर वाचनाची तीव्र इच्छा उत्पन्न होते.

सर्वच ५४ कविता अतिशय दर्जेदार असून दैनंदिन जीवनातील विविध विषय उत्तम प्रकारे हाताळलेआहेत. प्रत्येक कवितेतून ज्ञान,मार्गदर्शन,प्रबोधन तर आहेच तसेच सुविचार व सुवचनांची सुंदर गुंफण संबंधीत कवितांना पूरक ठरते. माय मराठीचा अभिमान, राष्ट्रभक्ती,शिक्षक व शाळेविषयीचा मौलिक विचार व जगाचा पोशिंदा बळीराजाची व्यथा यथोचित शब्दात मांडली आहे.

‘ जीवन जगण्याची कला ‘ , ‘ परिभाषा स्वार्थाची ‘, ‘ शिक्षक ज्ञानसागरातला दीपस्तंभ ‘, ‘अंकुर’, ‘ माणूस बांधू या ‘, ‘ हात हवे मज ‘, ‘ जीवन सुंदर आहे ‘, ‘ माझी शाळा ‘, ‘ अन्नदाता ‘, या नऊ कविता विशेष आवडल्या.त्यातील शब्द , विचार, उत्कट भाव-भावना थेट हृदयाला भिडल्या.आदर्श जीवनाचं सुयोग्य मार्गदर्शन योग्य शब्दात मांडलयं!

सौ. सविताताई यांची प्रस्तावना,आपला ऋणनिर्देश,श्री संग्राम कुमठेकर यांचा अभिप्राय , नूतन विद्याप्रसारक मंडळाच्या पदाधिकार्यांचे शुभेच्छापत्र ‘ स्नेहवलय ‘ च्या प्रतिष्ठेत भर घालणारे असून पान क्र.६० ते ६२ वरील आपलं संघर्षमय जीवन, प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन मिळवलेलं यश व चालून आलेले तब्बल १५ पुरस्कार, आपले छंद आम शिक्षक वर्गाला प्रेरक व मार्गदर्शकही आहेत. मुद्रक व मराठीचे शिलेदार प्रकाशकांचेही मनापासून आभार! मुद्रित शोधकाच्या चाणाक्ष नजरेतून अनावधानाने सुटलेले काही नगण्य मुद्रणदोष पुढील आवृत्तीत सुधारतील अशी अपेक्षा! पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन! पुढील वाटचालिसाठी शुभेच्छा व शुभ आशीर्वाद !

आपलाच
अनोळखी काका
स.ध.भावसार(वय ७७ वर्षे)

प्रेषक
सदानंद धडू भावसार
संतभाव,२०,साईकृपानगर,
राधाकृष्णा हाॅलजवळ,
नकाणे रोड,देवपूर,धुळे
पिन -४२४००२
दिनांक १२-७-२०२४

स्नेहवलय संग्रहाची प्रत आजच मागणी करा: संपर्क

श्री गणेश नरोत्तम पाटील
मु.पो.म्हसावद शिवकाॅलनी
ता.शहादा, जि. नंदुरबार
82085 30838

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे