0
4
8
2
8
4
काय असतं– पुस्तकात
चला चला रे वाचू या
मस्त पुस्तके वाचू या
आनंदाने शब्दाच्या दुनियेत
खुपच नाचू बागळू या
काय काय ….म्हणतायं
पुस्तकात असे काय असतं
उघडून तर बघा गंमत
कंटाळलेली स्वारी डुलतयं
अंधविश्वास दुर करून
खर ते विज्ञान कळतयं
ज्ञानाचं सागर मनी रमतयं
कोड,प्रश्नाची उत्तरे कळतयं
हसून हसून पोट दुखतयं
अशी विनोदी चुटकले असतयं
प्राणी,वनस्पती,कवीता, कथा
बसल्या जागेवर जग दिसतयं
कुसुमलता दिलीप वाकडे
नागपूर
0
4
8
2
8
4



