हेलन केलर यांचा आदर्श प्रेरणादायी -डाॅ.मधुसूदन घाणेकर
वसुधा नाईक, पुणे
पुणे : 28 जून 2024 : हेलन केलर दृष्टीहिन होत्या.त्यांनी प्रतिकुलतेवर मात करुन सा-या विश्वाला दिव्य दृष्टी दिली. त्यांचा आदर्श निश्चितच समाजाला प्रेरणादायी ठरला आहे, असे प्रतिपादन महिला सन्मान संस्थेचे संस्थापक, जेष्ठ साहित्यिक-विचारवंत आणि कलावंत डाॅ.मधुसूदन घाणेकर
यांनी केले.
कोथरुड येथील अंध
मुलींच्या शाळेत, महिला सन्मान संस्थेने आयोजित केलेल्या हेलन केलर जयंती निमित्त आयोजित केलेल्या अभिवादन सभेत डाॅ.मधुसूदन घाणेकर बोलत होते.प्राचार्य दामोदर सरगम अध्यक्षस्थानी होते.अंध मुलींना महिला सन्मान संस्थेतर्फे रोपे.वाटप आणि खाऊ वाटप
संस्थेच्या अध्यक्ष भारती महाडिक आणि निमंत्रक प्रिया दामले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.सचिव दीपाराणी गोसावी यांनी संयोजन केले. कार्याध्यक्ष सारिका सासवडे आणि डाॅ.घाणेकर यांनी उपस्थितांचे
मनोरंजन केले.प्राचार्य सरगम
यांनी समारोप केला.प्रशांत शिंदे यांनी महिला सन्मान संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.


