मेहकरध्ये शिवसेनेचे संजय रायमूलकर विरुद्ध लढणार भैय्यासाहेब पाटील अपक्ष निवडणूक
भैय्यासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली भूमिका
मेहकरध्ये शिवसेनेचे संजय रायमूलकर विरुद्ध लढणार भैय्यासाहेब पाटील अपक्ष निवडणूक
गडगंज श्रीमंत विरुद्ध सामान्य जनतेची असणार विधानसभेत लढाई.
भैय्यासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली भूमिका
जिल्हा प्रतिनिधी, बुलढाणा
बुलढाणा: विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. संजय रायमुलकर यांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणुन भैय्यासाहेब पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा आज मेहकर येथे पत्रकार परिषदेत भैय्यासाहेब पाटील यांनी केली आहे.
पाटील यांनी गेल्या 20 वर्षापासून श्री गजानन महाराज रुग्ण सेवा समिती च्या माध्यमातून नागरिकांना सेवा देत आहेत आणि त्यांनी नागरिकांच्या भेटी घेत आहेत. मेहकर लोणार मतदारसंघांमध्ये गेल्या 20 ते 25 वर्षांपासून अन्याय अत्याचार सुरू आहे.
पंधरा वर्षांपासून आरक्षित अनुसूचित जाती च्या जागेवर बनावट अनुसूचित जातीचे बनून खऱ्या मागासवर्गीयांवर होत असलेल्या अन्याय अत्याचारा ला वाचा फोडण्यासाठी खरा मागासवर्गीय आणि जनतेचा उमेदवार म्हणून येथील समस्या सोडवण्यासाठी पूर्ण वेळ देणार असल्याची प्रतिक्रिया मेहकर विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार भैय्यासाहेब पाटील यांनी दिली आहे.



