78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पाच्छापूर माध्यमिक शाळेला शालेय वस्तूंची मदत
जे. एस. एम. कॉलेज अलिबाग 2001 कला शाखेच्या बॅचकडून सहकार्य
78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पाच्छापूर माध्यमिक शाळेला शालेय वस्तूंची मदत
जे. एस. एम. कॉलेज अलिबाग 2001 कला शाखेच्या बॅचकडून सहकार्य
तुषार थळे, प्रतिनिधी
अलिबाग: जे. एस. एम. कॉलेजच्या 2001 च्या कला शाखेतील विद्यार्थ्यांनी आपला 78 वा स्वातंत्र्यदिन वेगळ्या पद्धतीने साजरा केला. पाच्छापुर शाळेत 150 पेक्षा जास्त शिक्षण घेत असून 95% विद्यार्थी हे आदिवासी आणि ठाकूर समाजातील आहेत. शाळेतील मुख्याध्यापक श्री. माळी सर व या शाळेला नेहमी मदत करणाऱ्या ट्रेक क्षितिज संस्था डोंबिवली यांच्या मदतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत या शाळेला जे. एस. एम. कॉलेज ग्रुप तर्फे आज एक कपाट, माईक, स्पीकर, तसेच किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन भेट देण्यात आले.
हे सर्व सामान विद्यार्थ्यांनी वर्गणीतून जमवले तसेच मुंबई येथील रिदय फाऊंडेशन या संस्थेमार्फत 110 लिहायचे pads मिळवून देण्यात आले. तसेच ग्रुप तर्फे 20 विद्यार्थिनींची दहावीची परीक्षा फी सुद्धा देण्यात आली व किशोरवयीन मुलींसाठी एक मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आले. जे. एस. एम. महाविद्यालयातील 66 विद्यार्थ्यांनी या कार्यात मदत केली.
आजच्या या कार्यक्रमासाठी जे. एस. एम. महाविद्यालयातून रसिक काळे, निलेश पाटील, सचिन गुरव, मनोज गावंड, सुहास तेलगे, ज्योती मगर, अश्विनी पाटील, साक्षी गुरव व ज्योती तेलगे हे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद, ग्रामस्थ तसेच ट्रेक क्षितीज संस्थेचे सर्व सदस्य देखील उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. माळी सर तसेच संस्थेचे अध्यक्ष यांनी जे. एस. एम. कॉलेज ग्रुप चे आभार व्यक्त केले.



