ताडगाव जिल्हा परिषद शाळेला क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरावर सुयश
प्रतिनिधी, अखिल रोडे
ताडगाव जिल्हा परिषद शाळेला क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरावर सुयश
वर्धा जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात खो – खो क्रीडा विभागात ताडगाव प्रथम
ताडगाव येथील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्याची
लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे ताडगावकऱ्यांची मागणी
प्रतिनिधी, अखिल रोडे
वर्धा / समद्रपूर: (दि ४): वर्धा जिल्हा परिषद येथे वार्षिक सांस्कृतिक व क्रीडा सोहळ्याचे आयोजन २९ जानेवारी २०२५ ते ३१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा परिषद क्रीडा संकुल येथे संपन्न झाले. या सोहळ्यात उद्घाटक म्हणून वर्धा जिल्हा परीषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नितीन रहमान व जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) डॉ. नितू गावंडे उपस्थित होते.
सांस्कृतिक व क्रीडा उत्सवाचे आयोजनात खो – खो, कब्बडी , लंगडी ई. सांघिक व गोळा फेक , थाळी फेक, १०० मी दौड, २०० मी. दौड अश्या वयक्तिक क्रीडा प्रकारचा समावेश होता. यात “ताडगाव ” संघाने जिल्ह्यात “प्रथम” क्रमांक पटकवला.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा.नितीन रहमान यांनी अथक प्रयत्नाने विजय कसा मिळवता येतो या बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले तसेच शिक्षणाधिकारी डॉ नितू गावंडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा प्रयत्न व मेहनतीच्या भरोशावर चांगले यश कसे संपादन करू शकते याबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषद संकुल वर्धा येथे ३१ जानेवारी रोजी खो – खो या क्रीडा प्रकारात ताडगाव शाळेने प्रथम क्रमांक पटकावत परीसरात नाव लौकिक मिळवले. आयोजित विविध स्पर्धेमधील विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी , मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशामागे ताडगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भास्कर कलाम, सहशिक्षक दिपक गायकवाड , हितेश चौखे यांच्या मोलाचा वाटा आहे. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवामित्र यांनीही विद्यार्थ्यांना सहकार्य केले. ताडगाव येथील विद्यार्थ्यांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. मंगरूळ केंद्राचे केंद्रप्रमुख संजय ढोक यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन केले.
अनुराग रोटेले, वेदांत ननावरे, अंश सावसाकडे, जितु दडमल, रौनक ढोणे, प्रिन्स वाघ, विहान श्रीरामे, ज्ञानेश दडमल , आदित्य गुळघे, वेदांत चौधरी, विवांश गजभिये , ऋषभ रोटेले, सक्षम वाघ ई विद्यार्थिनी ताडगाव संघातर्फे सहभाग नोंदविला.
ताडगाव हे गाव समद्रपूर तालुक्यातील आदिवासी गाव असून येथील विद्यार्थी नावलौकिक मिळाऊ शकतात याकरीता जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी ताडगाव परिसरात विद्यार्थी व युवकांना संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गावातील नागरीक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मित्र मंडळ ताडगाव यांच्याकडून करण्यात आली.



