
0
4
0
9
0
3
धुरकरी
अज्ञानाने गेले वाया, शिक्षित नाहीत झाले।
स्वार्थापोटी समाजास, कसे कलंकित झाले।।
मायबापा विसरून , दगडांना पुजतात।
पित्रुपक्षात घास ,कावळ्यांना घालतात।।
देवाचा धाक देऊन, लुटती हरामखोर।
दान दक्षिणा घेऊन, डल्ले मारतात चोर।।
भोळा समाज आता, बळीचा बकरा झाला।
ढोंगी धुरकरी हाती,बैलाचा कासरा आला।।
शिका शिक्षित व्हारे , विज्ञानाची कास धरा।
अज्ञाना दुर सारूनी ,जीवनी उध्दार करा।।
देव चराचरी आहे,कोणा नाही मागत काही।
सर्वांना तोच तारतो ,दुष्टांना सोडत नाही।।
सत्कार्य करा जीवनी, लबाडीने जगू नका।
पैसा कामी येत नाही,मृत्यूच देईल झटका।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा.जि यवतमाळ
========
0
4
0
9
0
3





