0
4
8
2
8
7
शिवार
शिवारात डुले हिरवेगार पीकं
बळीराजाच्या घामापुढं माणिकमोती फिकं
शिवारात राबे माझा बळीराजा
त्याच्या कष्टाचं होत नाही कधी गाजावाजा
जागतो, राबतो ,करतो हा काम
धान्याच्या राशीत सुकून गेला घाम
शिवार हे माझं आलं हो फुलून
आनंदले मन गेले कष्ट विसरून
शिवाराचा धनी धरतीला म्हणे माय
तिच्या अंगा खांद्यावरी तो रमतच जाय
सुनंदा किरसान
अर्जुनी मोर गोंदिया
0
4
8
2
8
7



