Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

माझे आवडते शिक्षक

अनिता व्यवहारे

0 4 8 2 8 6

माझे आवडते शिक्षक

काल कळ्या, आज फुले झाल्या सगळ्या
कशा उमलल्या? कुणी हसविल्या?
हासत बसल्या कशा कळ्या
सांगा मला सगळ्या. !

याचं सगळं श्रेय द्यायचे असेल तर ते द्यावे लागते आपल्या शिक्षकांना. शिक्षण क्षेत्राशी निगडित असलेलं नाव म्हणजे गुरुजी, सर, बाई, मॅडम आणि गुरु, हे एक अतूट नातं. शिक्षण, शाळा विद्यालय आणि महाविद्यालय यांच्याशी असलेल्या ‘गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी’ म्हणणारे येशूचे शिष्य, ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना तसेच शिखांचे धर्म संस्थापक गुरुनानक या सर्वांना आपण गुरूच मानतो. तसेच माझे शिक्षक हे ही माझे गुरू… त्यांना प्रणाम!

खरं तर माझ्या आयुष्यात आलेले प्रत्येक शिक्षक मला आवडतात. परंतु त्यातल्या त्यात मला अभिमान वाटतो माझ्या पहिली ते चौथीच्या वर्गाला शिकवणाऱ्या मराठीच्या शिक्षकांचा. ज्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत आले आहे. त्यांनी मला ‘क पासून ज्ञ पर्यंत’चे अक्षर गिरवायला शिकवले. ज्या हाताने चुकीबद्दल मार दिला, त्याचं कधीच वाईट वाटलं नाही त्याच हाताने प्रेमाने शाबासकीचा हात फिरवला. माणसाच्या जीवनात प्रथम गुरुचे स्थान आहे ते आईला हेही विसरून चालत नाही म्हणूनच सांगतात स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी त्या आईच्या शब्दांनी मूल बोलायला शिकते त्याची बोबडे, तोतरे शब्द आईच्या हृदयातच येतात व प्रेमळ हाक तयार होते आई. तरीही ही हाक मागे पडते.कारण प्राथमिक शाळेतील गुरुजी, शिक्षक आपली कोनशिला पक्की करून कळस बनवण्यासाठी आपल्याला मोठ्या शाळेत पाठवतात. माझ्या या शिक्षकांनी ही तेच केलं

पण त्या अगोदर त्यांनी रंग, गंध, रस, स्पर्श, ध्वनी या पंचज्ञानेंद्रियांच्या संवेदना माझ्या मनात जागृत केल्या. सृष्टीचे शाश्वत सौंदर्य अनुभवायला शिकवल. पक्ष्यांची अस्मान भरारी, सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर हिरव्या डोंगर उतारावर डोलणारी चिमुकली फुले हे सगळं काही त्यांनीच शिकवलं. स्पष्ट उच्चार ,स्वच्छ वाणी पाठांतर शुद्ध बोलणं साहित्यातील अभिरुची सुद्धा वद्धिंगत करणे व विचारांची कक्षा रुंदावणे हे सगळ माझ्या आयुष्यात त्यांनीच केलं. आठवणींना उजाळा देताना आज अगदी मनात विचारांची गर्दी झाली आहे अनेक प्रसंग आठवत मी पुन्हा भूतकाळात शिरत आहे सरांनी माझ्या अनुभवांची क्षितिज कक्षा इतकी रुंदावली त्यामुळेच मी भूतकाळाचा मागोवा घेऊ शकले वर्तमानाशी संघर्ष करण्याची उमेद माझ्यात आली आणि भविष्यकाळाचा वेध घेण्याची जाणीव मनात निर्माण झाली.

मला नक्कल करायला खूप आवडायची निरनिराळ्या पक्षांचे प्राण्यांचे आवाज काढायचे कोणाच्या चालण्याच्या, बोलण्याच्या ढंगाच्या अनुकरण करायचे हे सर्व पाहिल्यावर त्यांनी मला सांगितलं की बाळ तुझ्यात अभिनयाचे गुण आहेत मला नाटकात सफाईदारपणे वावरायला त्यांच्यामुळेच शिकता आलं विनोद कारुण्य हास्य हे गुण जीवनात किती महत्त्वाचे आहे हे त्यांच्यामुळेच उमगलं. शिक्षक हा एक वसा आहे घेतला वसा मी कधी टाकणार नाही हे त्यांच्या कृतीतून जाणवलं. त्यांच्यामुळे माझ्या अंगी अधीर होण्याचं धैर्य. धीर धर ण्याची कलाआणि त्यासाठी जागवला दृढ विश्वास आणि श्रद्धा. म्हणूनच माझे ते शिक्षक मला खूप खूप आवडतात.

आज मी इथे जी बोलते आहे ते त्यांच्या मुळेच, कारण त्यांनीच मला वक्तृत्व कलेचे धडे गिरवून घेतले आणि कुठल्याही विषयाची मांडणी उच्चार उभे राहण्याची पद्धत आपले मत मुद्दे उठावदार पणे मांडण्याची रीत याबद्दल माझ्याकडून तयारी करून घेतली सभाधीटपणा ओघवती शैली स्पष्ट शब्द उच्चार हे वक्तृत्व गुणही त्यांच्यामुळेच मी आत्मसात करू शकले. जे सत्य आणि न्याय्य आहे त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा व ऐकाव जनाचं अगदी सर्वांचं… पण गाळून घ्यावं ते मनाच्या चाळणीतून आणि फोलपट टाकून निकस तेवढच करावं.. हेही या शिक्षकांच्या मुळे मी शिकले नेहमी आनंदी राहा इतरांना आनंदी करा. सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात सगळीच सत्यनिष्ठ नसतात स्वार्थी राजकारणी धूर्त असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे ही असतात.

जसे असतात टपलेले वैरी तसे च असतात नाती जपणारी मित्र. हे सुद्धा याच शिक्षकांच्या मुळे शिकले आनंदही संयमाने व्यक्त करायला आणि द्वेष मत्सर या पासून दूर राहायला शिकवले. आणखी त्यांच्याबद्दल कितीही सांगितलं तरी ती यादी वाढतच राहील. ते म्हणत की मी एक शिक्षक आहे शिक्षण हाच माझा स्वधर्म आहे विद्यार्थी हे माझे दैवत आहे शाळा हे माझे मंदिर आहे धडपडही माझी पूजा आणि दुरितांचे तिमिर जावो ही प्रार्थना समाजाचा आशीर्वाद हाच आमचा प्रसाद या वेळी मला खांडेकरांचे एक वाक्य आठवते जगाचा कधीकाळी उद्धार झाला तर तो शिक्षकांमुळे होईल.

प्रत्येक मूल असतं एक आकाश. त्याच्या पावलात असते एक नवी दिशा प्रत्येक मुल असते एक संपूर्ण स्वातंत्र्य हे मला त्याच शिक्षकांनी समजावून दिलं. एक्स स्वप्नाने अपेक्षा होती माझ्या शिक्षकांची माझा विद्यार्थी हा वायफळ जाऊ नये त्याचे जीवन हे उत्तरोत्तर फुलत रहावे त्याच्या घरी सुखसमृद्धी नांदावी म्हणून त्यांनी मला जे शिकवलं या ज्ञानमंदिरा जे दिलं त्या मंदिराला मी कधीच विसरू शकणार नाही. धन्य ती माझी शाळा आणि धन्य ते माझे शिक्षक.

अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
=======

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे