0
4
8
2
9
0
आत्मबंधन
सप्तपदीची सात पाऊले
तुझ्यासवे मी चालले
सात वचने दिली घेतली
मी तुझी भार्या जाहले
आत्मबंधन मना घातले
सासरचे माप ओलांडता
या घरची मी झाले सखया
अनेक नात्यांनी बांधता
सुखासवे दु:खही आले
संसार सागर तरताना
नयनी आसू ओठी हासू
कर्तव्य कर्म करताना
सासू सासरे दीर जावा
जपले किती जणांना
मना घातली मुरड सदा
वीण नात्यांची विणताना
घर हे माझे असे हसरे
इथे सुखाचा पडे सडा
पती प्रेमाने कृतार्थ झाले
भरे समाधानाचा घडा
वृंदा(चित्रा)करमरकर
जिल्हा सांगली
=========
0
4
8
2
9
0



