Breaking
कविताक्रिडा व मनोरंजननागपूरसाहित्यगंध

संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 5 7 7 4 4

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : बेधुंद आसमंत📘*
*🔸सोमवार : २० / ०७ /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*बेधुंद आसमंत*

पहिल्या सरींनी माती मोहरली,
मोरपंखी तालावर सृष्टी डोलली…
बेधुंद आसमंत निसर्गस्वप्नात हरवला..

*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐💦💐➿➿➿➿
*बेधुंद आसमंत*

बेधुंद आसमंत नभात इंद्रधनूची किनार न्यारी
स्वप्नांना लाभली नवी उंच भरारी
विश्वासाच्या बळावर जिंकू यशाची शिखरे सारी

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐💦💐➿➿➿➿
*बेधुंद आसमंत*

बेधुंद आसमंत धरा मदमस्त धुंदावली
चोहीकडे प्रेमाची हिरवळ पसरली
प्रामाणिकपणाची हार अन् मी प्रेमवंचित ठरली

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*सहप्रशासक /मुख्यपरीक्षक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐💦💐➿➿➿➿
*बेधुंद आसमंत*

झाला बेधुंद आसमंत सारा
सुटला गार गार मंद धुंद वारा
फुलवी हृदयी प्रीत ऋतू ओला

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐💦💐➿➿➿➿
*बेधुंद आसमंत*

खट्याळशा बेधुंद आसमंतात
वर्षाराणी मेघाच्या रथात
बळीराजा अंतरी मोदात

*सौ.सुनिता लकीर आंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💐💦💐➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*बेधुंद आसमंत*

पावसाच्या सरींनी झाला
बेधुंद आसमंत सारा
आनंदाचा बहर आला

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐💦💐➿➿➿➿
*बेधुंद आसमंत*

बेधुंद आसमंत म्हणजे
मुक्त श्वासांची कहाणी
निराशा नसावी जीवनी

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐💦💐➿➿➿➿
*बेधुंद आसमंत*

कुठे जलधारा, कुठे वारीची परंपरा
कुठे सत्यासाठी, तरुणाईचा पहारा
आशेच्या नभात, बेधुंद आसमंत सारा

*स्वाती इंद्रजीत लभाने, वर्धा*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐💦💐➿➿➿➿
*बेधुंद आसमंत*

बेधुंद आसमंत बहरतो भेदभावमुक्त
लतावेली वृक्षवल्लीतून होतो व्यक्त
माणूस मात्र पूर्वग्रह दोषयुक्त

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐💦💐➿➿➿➿
*बेधुंद आसमंत*

बेधुंद आसमंत, पावसधारा गात सुटल्या,
धुंद झाल्या वाटा, हिरव्या स्वप्नांनी नटल्या।
हसऱ्या मनाच्या ओंजळी, आनंदलहरी दाटल्या॥

*मनोज परसराम शिंदे*
*ता पालम जिल्हा परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐💦💐➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 7 4 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे