0
4
8
2
9
3
विसरू नको ऋण
विसरू नको मातापित्यांचे
तुझ्यावर आहेत ऋण
प्राणपणाने सांभाळ त्यांना
उपकार त्यांचे स्मरूण ||१||
मायबाप दैवत आपले
चरणी नतमस्तक व्हावे
उतारवयात आबाळ नको
आपण त्यांची काठी व्हावे ||२||
आईची अंगाई आठवावी
बापाचे आठवावे प्रेम
दोघांचीही सेवा करावी
हाच असावा नित्यनेम ||३||
दुखले खुपले त्यांचे काही
काळजी त्यांची घ्यावी
मायाममतेची सावली आता
आपणच त्यांना द्यावी ||४||
बाकी काही नकोच त्यांना
हवाय फक्त आधार
धन्य तुझा जन्म झाला
मान देवाचे आभार ||५||
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी, जुन्नर, पुणे
=========
0
4
8
2
9
3



