0
4
8
2
9
7
रंगवू मैफली जीवनाच्या..
या चिमण्यांनो परत फिरा रे
घराकडे मानवतेच्या
सोडून वाटा द्वेषाच्या अन्
वेदनादायी तिरस्काराच्या
मिळुनी राहू घरी अंगणी
पंखाखाली प्रेमाच्या
चिवचिवणारे बोल घेऊन
शोधू वाटा आनंदाच्या
खोपा बांधू आधाराचा
काड्या काड्या जिव्हाळयाच्या
धागा धागा माया ममतेचा
गाठी नाजूक भावबंधाच्या..
कण कण दाणा वाटून खाऊ
ज्योती उजळू बंधूभावाच्या
लटक्या रागे भांडू तंटू
परी ना गोष्टी मनभेदाच्या
वाद विवादे खेटू तात्पुरते
टाळू फैरी मतभेदाच्या
दुःखाचेही व्हावे गाणे
रंगवू मैफली जीवनाच्या.
दुःखाचे ही व्हावे गाणे
रंगवू मैफली जीवनाच्या…
वर्षा मोटे पंडीत
छ.संभाजीनगर
0
4
8
2
9
7



