0
4
8
2
9
3
देवदूत
उमजले असता उमजतो
समजले असता समजतो
भ्रमातील माया की परब्रम्ह
वर्तनातला देवदूत कळतो
क्षणात रूपे बदलतो
अष्टता प्रकृतीने समजतो
कधी अमर्याद वागतो..
चित्रविचित्र रुपात दिसतो
किती शरीर बदलतो
अनेक नावेही ठेवतो
नाना रिती त्याच्या…
काळ परत्वे भाषा बदलतो
माती धातू पाषाणातून
दिसती प्रतिमा अनेक
जप ध्यानातूनही कळतो
अध्यायी देवदूतांचा दंडक
कधी अवतार महिमा
प्रकृती मधील देव..
भावतो त्यांचा महानुभाव
समजतो सृष्टीतला स्वभाव
सिंधू बनसोडे
इंदापूर.पुणे
========
0
4
8
2
9
3



