0
4
8
2
8
4
कट्टीचा महिना
संपली आता परीक्षा
चला खेळ खेळूया…
सुट्टीच्या या वेळेला
गावा…मस्तीच्या जाऊया ।।
आला आला गाडा
नाव काय फोडा…..
म्हणत आपण आपापल्या
मैत्रिणी निवडूया…।।
नाही मिळाली मैत्रिण
म्हणून रूसू बाई रूसूया
कट्टी मट्टी बारबट्टी….
करुन कोपऱ्यात बसुया ।।
मजेदार आवाजाने
तिला सारे हसवूया
माकन होवून दातही
तिच्यापुढे विचकूया ।।
क्षणात कट्टी तोडून मग
मैत्री पुन्हा करूया…..
सुट्टी कट्टीचा महिना हा
आनंद क्षणात पोहूया….।।
कंचना मंडपे
ता.जि.नागपूर
==========
0
4
8
2
8
4



