ई-पेपरकवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
आयुष्याचा मध्यबिंदू
दत्ता काजळे(ज्ञानाग्रज)
0
4
8
2
9
0
आयुष्याचा मध्यबिंदू
आयुष्याचा मध्यबिंदू
आला आहे दारावरी
टिकटिक त्याची सदा
देई मज ललकारी ॥
काळे काळे केस माझे
शुभ्र होती हळूहळू
चाळिशीच्या पैलतिरी
मागे कसे आता वळू ॥
जाड भिंगी चष्मा आता
साथ देत असे भारी
संसारात रमलेलो
करु वाटे मज वारी ॥
प्रगल्भता परिपक्व
होऊ पाहतेय आता
विनोदाची झालरच
आठी घालतेय माथा ॥
आयुष्याचा मध्यबिंदू
सारे काही मिळवतो
रम्य अशा आठवणी
बालपण हरवतो ॥
दत्ता काजळे(ज्ञानाग्रज)
तुरोरी जि. धाराशिव
=========
0
4
8
2
9
0



