0
4
8
2
8
6
माय
भल्या पहाटे उठूनी
उरकते काम सारे
नसे अंगाला शिवत
बोचणारे गार वारे.
अस्ताव्यस्त पडलेला
सारा आवरे पसारा
हंबरून सांगतेय
गाय टाका मला चारा.
पोट भरलेय सारे
करी कपिला इशारा
घ्यावे भांडे हाती आता
काढा दुधाच्या त्या धारा.
चिंता सदा दाटे मनी
काय असेल घरात
तेला विना कशी करू
भाजी ती वरणभात
वाट पाही सारेजन
कधी येतील ते नळ
नसे थेंबही पाण्याचा
जीव होई तळमळ.
दीपककुमार सरदार
ता. लोणार जिल्हा बुलढाणा
===========
0
4
8
2
8
6



