
0
6
5
5
8
4
आईच्या पदराची सावली
घराच्या उंबऱ्यावर
आजही तिच्या पावलांचा गंध दरवळतो,
भिंतीवरच्या जुन्या छायाचित्रात
माझा हरवलेला बालपणाचा क्षण सापडतो.
तिच्या पदराला धरुनी
मी जगण्याचे धडे शिकत गेलो,
अंधारलेल्या वाटांवरही
तिच्या विश्वासाने पुढे चालत गेलो.
माझ्या स्वप्नांना आकाश देताना
तिने स्वतःचे आभाळ दान केले,
माझ्या प्रत्येक विजयामागे
तिने आयुष्याचे मूक बलिदान सहन केले.
तिच्या त्यागाला मोल नाही,
तिच्या प्रेमाला अंत नाही,
आईच्या पदराची सावली म्हणजे—
देवाच्या कृपेहून सुंदर दुसरी ओढ नाही!
अंकुश सालपे
ता. जिल्हा नागपूर
0
6
5
5
8
4



