Breaking
अलिबागई-पेपरकविताकोकणसाहित्यगंध

अभिजात मराठी

मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड

0 4 8 2 8 6

अभिजात मराठी

समृद्ध वैभवशाली इतिहासात
बघायची असतील जर भाषेची मुळं…
सांस्कृतिक,कला,साहित्यक्षेत्रात
मराठीची सापडतील सर्वात श्रेष्ठ कुळं…

गड, किल्ले ही सह्याद्रीचे
देती साक्ष हिंदवी स्वराज्याची..
दऱ्याखोऱ्या ही सांगती गाथा
माझ्या छत्रपती शिवरायांची…

छत्रपती संभाजीराजे पराक्रमी
मोगलांशी लढले जणु झंझावात..
संस्कृत पंडित,भिन्न भाषा तज्ज्ञ
बुधभूषणम् ग्रंथ त्यांचे विख्यात…

अभंग,ओवी,भारूड,कीर्तन,पोवाडा
लावणीत लोक संगीताची गोडी..
ज्ञानेश्वरी,दासबोध ग्रंथ पारमार्थिक
संसारात असूनही देवभक्तीचे तार जोडी..

पु.ल., विं.दा., कुसुमाग्रज,बहिणाबाई
इंदिरा संत,व.पुं. सारखे साहित्यिक महान..
ग.दि.माडगूळकरांचे गीत रामायण
त्यावर बाबूजींच्या स्वरांचे सुश्राव्य गान…

सारे गौरव काव्य रचनेत गुफंणे
शक्य नाही पुण्यपावन महाराष्ट्राचे
उगवला सूर्य दिसले किरण आशेचे
गर्व मजला माझा मराठी भाषेचे..

अभिजात मराठी भाषेचा दर्जा
मिळवूनी तुरा खोवला सन्मानाचा..
अटकेपार फडकवला झेंडा
सर्व महाराष्ट्रासाठी क्षण हा अभिमानाचा..

मृदुला कांबळे
गोरेगांव -रायगड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे