Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 4 8 2 9 0

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट बारा🎗🎗🎗*

*🥀विषय : अस्तित्वासाठी🥀*
*🍂बुधवार : २६/ फेब्रुवारी /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*”अस्तित्वासाठी”*

कुठे चुकलो कुठे मुकलो,
माझे मलाच कळले नाही…
कळले तेव्हा कधीच माझे,
अस्तित्व काही ढळले नाही…१

आपुले होता वैरी आपुले ,
पायाखालची वाळू सरके…
जीवापाड जीव लावला,
तेचि झाले आहेत परके…२

ज्यांना जपले… तेचि कोपले,
उरले फक्त………..नावापुरते…
तरी माझा त्यांच्यासाठी बघा,
आज ही जीव ….आहे झुरते…३

कुणी पिटले ……कुणी कुटले,
माझे अस्तित्व …पाटण्यासाठी…
*”सुधाकरा”* तरी ताठ उभा,
फक्त इमानी *अस्तित्वासाठी*…४

*सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌈🚩➿➿➿➿
*अस्तित्वासाठी*

लढाई चालू आहे माझ्या अस्तित्वासाठी
वरून बांधून आल्या लग्नाच्या गाठी…

लग्न म्हणजे काही पोर खेळ नाही
आनंद , राग, द्वेष आहे सर्व काही….

संसार नवा हवा, हवा असाच वाटतो
नविन्याचे वारे हृदयात भरतो….

कष्ट करतात पण आनंदात राहतात
एकमेकांच्या सुखदुःखांचे वाटेकरी होतात….

संसार वेलीवर फुललीत दोन फुले
देखणी, गोंडस, हुशार दोन मुले…

वर्षा मागून वर्ष छान सरत चालले
चौकोनी कुटुंबात दोघेही रमले….

मग दृष्ट लागली सुंदर संसाराला
संसाराचा एक तारा अचानक निखळला…

शक्यच नाही आता खचून जाणे
पदर खोचून सदा कामाला लागणे…

मुलांचे भवितव्य पाहायचे आहे मला
एवढे साधे कस नाही कळले रे तुला…..

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी,जिल्हा – पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌈🚩➿➿➿➿
*अस्तित्वासाठी*

काय बदलेल भविष्य
रेषा तुमच्या भाळाची
अस्तित्वासाठी संघर्ष
गरज आहे काळाची.. //

आठवा शिवा संभाची
पराक्रमाची यशोगाथा
ज्यामुळेच उन्नत आहे
आज सह्याद्रीचा माथा.. //

मोगली दडपशाहीच्या
किती भयानक व्यथा
अस्मितेच्या लढाईची
कशी वर्णावी ती कथा.. //

स्वराज्याचे शिल्पकार
एक छत्रपती शिवाजी
त्या स्वराज्याचे रक्षक
दुजे छत्रपती संभाजी.. //

अद्भूत शक्ती युक्तीचा
संगम गनिमी कावा
मावळ प्रांतीचे शूरवीर
एक सिंह एक छावा.. //

देव,धर्म,अन् राष्ट्राच्या
लढले अस्तित्वासाठी
अवघे आयुष्य वेचले
हिंदवी स्वराज्यासाठी.. //

जिथे तिथे देवूनी शह
रक्षिले मंदिरांचे कळस
शिवबामुळेच अबाधित
आज अंगणीची तुळस.. //

धन्य जिजाऊ माऊली
धन्य शिवा ह्रदयरत्न
एकमेवाद्वितीय राजा
साकारले मातेचे स्वप्न.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌈🚩➿➿➿➿
*अस्तित्वासाठी*

खाचखळग्यांच्या वाटेवर
चालायला शिक गं
भेदून अंधाराला
लाव तेजाचा दीप गं…

सावित्रीची लेक तू
ज्ञानाची स्वामिनी गं
तव हत्यार लेखनी
स्वातंत्र्य, समतेची वर्धिनी गं..

तुज जिजाऊंचा वारसा
रक्तात स्वाभिमान गं
नाही दुर्बल्याची दासी तु
अंगी दहा हत्तीचं बळ गं…

जात तुझी सिंहिणीची
छाव्याची जन्मदात्री गं
काय होईल, कसे होईल
दे विचारांना मुठ माती गं…

ताराबाई, येसुराणी
जाज्वल्य तुझा इतिहास गं
शौर्य शोभे रणांगणी
उडे शत्रूचा थरकाप गं…

झाशी अन् अहिल्या
रूपे ही तुझीच गं
घे कवेत पराक्रमाला
निशंक रहा मनात गं…

आडव्या आल्या शत्रूशी
कर दोन हात गं
अबला नव्हे सबला तू
सांग अवघ्या जगास गं…

अस्तित्वासाठी तुझ्या
तूच आहेस समर्थ गं
भीती नको उराशी
पेटव शक्तीची मशाल गं…

*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌈🚩➿➿➿➿
*अस्तित्वासाठी*

टाक तोडूनी बेड्या पदीच्या
झेप घेई तू क्षितीजापार
तुझ्या अस्तित्वासाठी नारी
हिंमतीने तू लढ गं अपार

शौर्याचे स्फुल्लिंग चेतवून
पेल सारी गे तू आव्हाने
अत्याचाऱ्यांना काढ ठेचूनी
रागिणी जग ताठ मानेने

नको आता झुरणे रडणे
विद्या भूषित हो मनस्विनी
स्वयंसिद्धा तूच मानिनी
कुटुंबाचा आधार भामिनी

पंख पसरून कर्तृत्वाचे
काबीज कर तू यशशिखर
आत्मज्योत मनी तेवू दे
नारी स्वतःला सिध्द कर

तूच अहिल्या तू जिजाऊ
इतिहास तुझा घडव नवा
अस्तित्वाने तुझ्या उजळो
दिशांमध्ये प्रकाश नवा

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌈🚩➿➿➿➿
*अस्तित्वासाठी*

मी अस्तित्वासाठी रोज लढतो आहे
कधी उपाशीच रात्र ढकलतो आहे
कोण आहे सांगा दोषी यात
मी औषधीविना खोकलतो आहे

लखलाभ असो तुम्हा ते बजेट
का फुकाच्या रेवड्या वाटतो आहे
कोणी मागितली होती सांगा मदत
उगाच का तुमचा कंठ दाटतो आहे

झिजवल्या पायर्‍या व्यवस्थेचा
कुठे न्याय मिळतो आहे
जिसकी लाठी उसकी भैस
तो सर्रास कायदा गिळतो आहे

कैक करती आत्महत्या इथे
सांगा प्रश्न कुठे सुटतो आहे
श्रीमंताचे पुरविता चोचले
सामान्याचा दम घुटतो आहे

अजुनही ती निर्भया का
अस्तित्वासाठी लढते आहे
कैक कडक कायदे केले
पुन्हा पुन्हा तेच का घडते आहे

*✍️मृद्गंध✍️*
*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌈🚩➿➿➿➿
*अस्तित्वासाठी*

इवलीशी मुंगी कडाडून
डसते जेव्हा अस्तित्वासाठी
झिणझिण्या येतात मेंदूत
हात पटकन उठतो पाठी

मधमाशीलाही कळते
खऱ्या आणि खोट्यातला
फरक जाणून घेते अलगत
निवडते पराग फुलातला

विंचवाचे नांगी बारीकशी
तरीही लाही लाही करते
अस्तित्वासाठी सारे विष
दंश करून परत वळते

दाखवून द्यायचे जगाला
जर कर्तबगारी कामाची
उगाच मारून फुशारकी
लाज कशाला घामाची

इथे अस्तित्व टिकवायचे
जर असेल मनात कायमचे
कष्टाला पर्याय नाही रे
पालन कर सदा नियमाचे

*सविता धमगाये नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌈🚩➿➿➿➿
*अस्तित्वासाठी*

जगू नको,गुलामीत
नको राहू,पराधीन,
तुझे तुलाच, फुलवायचे
जीवनाचे नंदनवन.

कर,आत्मसात ज्ञान
संस्कार शील,जपून,
नको,सैराट होऊ
पाळ, मनाचे बंधन,

झुंज,तुलाच द्यायची
स्व अस्तित्वासाठी,
लढाई,जीवन जगण्याची
ध्येयप्राप्ती साठी.

आहेस सर्वंच क्षेत्रात
सरस आणि अव्वल,
आत्मविश्वासाने सावर
बऱ्या वाईटाचा तोल.

उल्लेखनीय कार्य तुझे
पेलतेस जिद्द आणि चिकाटीने,
जीवन जगण्याची हातोटी
हाताळतेस खंबीरपणे.

*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌈🚩➿➿➿➿
*अस्तित्वासाठी*

स्वःताला स्वतासाठी कर तयार
जीवन. होतोय दुषवार
धैर्याने तू कर सामना
मोहून टाक तू सर्वांना

काढून फेक दुषीत विचार
विवेकाने चेतव प्रकाश
दिपव सर्वांचे डोळे
दे धीर आपल्याच मनाष

तुला तुझेच करायचे
आहे कायम टिकवायचे
मर्यादेच्या पलीकडे न वागता
आहे सुंदर तुला जगायचे

हा लढा तुझ्या अस्तित्वासाठी
सावर तु आता स्वःताला
स्वताचेच अस्तित्व कर निर्माण
आबाधित ठेव जीवनाला

नाही साथ मिळणार तुला
सावर तु स्वःताच्या मनाने
करून धैर्याने संकटावर मात
जग जीवन तू आनंदाने

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🚩🌈🚩➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १५९ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*अस्तित्वासाठी*

स्वतःच्या अस्तित्वासाठी
जो तो धडपड करत आहे,
टिकवण्या अस्तित्व आपले
जिवाचे रान करतो आहे…

रखरखत्या वैशाख उन्हात
ताठ मानेने उभारला आहे,
केसरी ज्योतीच्या फुलांनी
पळस सजलाधजला आहे…

पानगळ झाली जरी वृक्षास
नवीन पालवी फुटते आहे,
मुळ्या रोवून खोल धरित्रित
तिन्ही ऋतूत टिकतो आहे…

हिरवीगार वनराई फुललेली
फुला फळांनी बहरते आहे,
शेती होते उजाड माळरानी
तिथेपण पाणी मिळते आहे…

ईवलासा जीव सुगरणीचा
खोप्यात जन्मास येत आहे,
अस्तीत्व निर्माण करायला
जीव झाडाला टांगते आहे…

शिक मानवा निसर्गाकडून
निसर्गही लढाई लढत आहे,
तू उगाच खचून रडणे नको
अस्तित्वासाठी लढणे आहे…

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌈🚩➿➿➿➿
*अस्तित्वासाठी*

निसर्गाला लागले ग्रहण
नष्ट होत चालले सौंदर्य
मानवाच्या स्वार्थी वृत्तीपुढे
वसुंधरेचे संपुष्टात ऐश्वर्य

वृक्षवल्लीची वाढली तोड
उन्हाच्या सोसावेना झळा
प्रदूषणाने घातले थैमान
प्लास्टिकमध्ये नटला मळा

चहुदिशांनी ओरबडली
तिच्या अस्तित्वाची काया
मोठ्या इमारती उभारून
शोधत फिरतो वृक्ष छाया

डोंगरे पडली ओसाड
दूषित झाले नदीचे पाणी
लुप्त झाली पाखरांची
मधुर किलबिलाट वाणी

जिने घडविले आपले अस्तित्व
तिच्या अस्तित्वासाठी एकत्र येऊ
प्रदूषणाला घालू आळा
निसर्गाचा समतोल राखू

*कुशल गो डरंगे, अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌈🚩➿➿➿➿
*अस्तित्वासाठी*

देत राहा लढा नारी
तुझ्या स्व-अस्तित्वासाठी
तूच जीवन शिल्पकार
तूच तुझी आधार काठी..

तुझ्या भावनांचा कोंडमारा
का गं करतेस प्रत्येक वेळी
मनातील द्वंद्व घेतोय मग
आपसूकच स्वतःचा बळी..

पावलोपावली भेटतील
डिवचणारे नाहीच कमी
तुझ्या आनंदमय जीवन
प्रवासाची तूच घे ना हमी..

विश्वास ठेव गं देवावर
नसेल जरी दैवाची साथ
खंबीर राहून मनाने बेधडक
कर नाना संकटांवर मात..

वेदनादायी घटना अशा
घडत राहतील कित्येक
सत्याच्या मार्गावर चालत
टाक पुढे पाऊल नेक..

फुलव तुझे जीवन पुष्प
सुज्ञ लोकांच्या संगतीत
नाहक बंधनाना झुगारून
जीवनानंद लुट हर गोष्टीत..

*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दा.न.ह.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🚩🌈🚩➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे