Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूर

सिर्सी येथे संयुक्त जयंती महोत्सव व महिला गौरव सोहळा उत्साहात संपन्न

अखिल रोडे, सिर्सी उमरेड

0 4 8 2 9 7

सिर्सी येथे संयुक्त जयंती महोत्सव व महिला गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विविध क्षेत्रांतील ‘सावित्रीच्या लेकींचा’ गौरव

नागपूर, सिर्सी प्रतिनिधी

अखिल रोडे, सिर्सी उमरेड

बिनधास्त न्यूज नेटवर्क

सिर्सी : रमाई बुद्ध विहार, सिर्सी यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारताच्या प्रथम महिला मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख, राजमाता जिजाऊ आणि त्यागमूर्ती रमाई यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन ७ फेब्रुवारी २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचा जागर करत विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
प्रबोधनात्मक वैचारिक मेळावा
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमाई बुद्ध विहार व सावित्रीबाई फुले कॉन्व्हेंट स्कूलच्या संचालिका मा. संगीताताई गजभिये यांनी केले. प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा येथील डॉ. माधुरी झाडे यांनी ‘महापुरुषांचा वैज्ञानिक व सामाजिक दृष्टिकोन’ या विषयावर ओघवत्या भाषेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच जनहित संघर्ष समितीच्या संस्थापक अध्यक्षा मा. जैबुनिरस्सा शेखताई यांनीही आपले विचार मांडले.

विविध क्षेत्रांतील ‘सावित्रीच्या लेकींचा’ गौरव याप्रसंगी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला, त्यामध्ये:
* मा. वंदनाताई साळवे: पोलीस दामिनी पथक प्रमुख (बेला), उत्कृष्ट पोलीस सेवा.
* मा. माधुरी मोरेश्वर घरत: बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण.
* मा. संगीताताई गजभिये: शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदान.
* मा. मिनाक्षी फुलझेले: आरोग्य विभागातील उत्कृष्ट सेवा.
* मा. स्वातीताई अतुल नारनवरे: बचत गट क्षेत्रातील कार्य.
* कुमारी अल्फीया अगवान: मार्च २०२५ च्या परीक्षेत ८२% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल विशेष सत्कार.
मान्यवरांची उपस्थिती आणि सांगता –
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिर्सीच्या सरपंच मा. वंदनाताई किशोर बुटे होत्या. दुपारी व्याख्यानानंतर सायंकाळी संगीतमय कार्यक्रम आणि त्यानंतर सामूहिक स्नेहाभोजनाने या महोत्सवाची सांगता झाली.प्रमुख उपस्थितीमध्ये माजी सभापती मिलिंदजी सुटे, माजी सभापती सावित्रीबाई ढोबळे, माजी सरपंच निखिताताई चुटे, मुकेश झाडे, आंबुलकर सर ,अतुल अरसपुरे यांची उपस्थिती होती. पत्रकार बांधव अमित नवनागे, पुंडलिक कामडी, खुशाल वैद्य, अखील रोडे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली होती. संगीतमय कार्यक्रम आणि स्नेहभोजनाने या सोहळ्याची सांगता झाली.या यशस्वी आयोजनाबद्धल सीर्सी परीसरातील नागरीकांनी आयोजकांचे कौतुक केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे