Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

आंबेडकराईट वूमन हेल्प ग्रुप तर्फे वाचनालयाला स्पर्धा परिक्षेची पुस्तके भेट

सविता धमगाये, शहर प्रतिनिधी नागपूर

0 4 8 2 9 7

आंबेडकराईट वूमन हेल्प ग्रुप तर्फे वाचनालयाला स्पर्धा परिक्षेची पुस्तके भेट

सविता धमगाये, शहर प्रतिनिधी नागपूर

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

नागपूर: शहरातील ‘आंबेडकराईट वुमन हेल्प ग्रुप’ तर्फे तथागत धम्म विहार, येथील राष्ट्रपिता ज्योतिबा फुले वाचनालयाला स्पर्धा परीक्षांची पुस्तके नुकतीच दान करण्यात आली.

‘आंबेडकराईट वुमन हेल्प ग्रुप’ तर्फे ग्रुप सदस्य करुणाताई मून यांच्या पुढाकाराने विश्वकर्मा नगर स्थित वाचनालयाचा स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे दान करण्यात आले आहे. ग्रुप तर्फे दरमहा प्रत्येक सदस्यांकडून मासिक माफक दान जमा करून त्या पैशातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना, मदत करण्यात येत असते. ‘विहार तेथे वाचनालय’ या उपक्रमाअंतर्गत यापूर्वी नालंदा वाचनालय सुरू करण्यात आले आहे. तसेच तथागत धम्म विहारातील वाचनालयात विद्यार्थी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करण्यासाठी येतात मात्र त्यांना पुस्तकांची उपलब्धता नसल्यामुळे आमच्या ग्रुप तर्फे आवश्यक वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षांचे पुस्तके देऊन मदत करण्यात आली.

पुढेही या ग्रुप तर्फे असे काम सुरू ठेवण्यात येणार आहे. तथागत धम्म विहारात छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रास्ताविक विहाराचे मेंटर सुबोध नगरारे यांनी केले. मार्गदर्शन रंजनाताई वासे, सरिता सातरडे, उज्वला गणवीर, अपेक्षा अमीन दिवाण, सविता धमगाये, सीमा थुल, मीना बागडे यांनी केले. त्याचप्रमाणे ग्रुप च्या सदस्या योगिता बन्सोड, बबन वासे, जिजा नगरारे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अभ्यासकर्ता रविकांत धुप्पे यांनी केले तर आभार प्रदर्शन अभ्यासकर्ता अजय कोसे यांनी केले. वरील कार्यक्रमास स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता रुचकर मसाले भात आणि कढी याच्या आस्वाद घेऊन झाली. ग्रुप मधील सर्व सदस्य दरमहा आर्थिक मदत करतात व जे कार्यक्रमास उपस्थित राहिले व काही कारणांनी उपस्थित राहू शकले नाहीत त्यांचे मनःपूर्वक आभार. असेच सर्व सोबत राहा व आपण सर्व मिळून नवनवीन उपक्रम राबवित राहू.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे