0
4
8
2
9
7
प्रेमरोग
चोरून बघणं । कटाक्ष टाकणं
नाक मुरडणं । कशासाठी ॥ १
इशारे करणं ।गालात हसणं
वळून पाहाणं । कुणासाठी ॥ २
चोरपावलांनी त्या । गच्चीवर येणं
घिरट्या घालणं । क्षणोक्षणी ॥३
चलबिचल ही । अवस्था असणं
अशीही लक्षणं । शोधू पाहे ॥ ४
बावरून जाणं । लक्ष न लागणं
रोग हा जडणं । बरं नाही ॥५
वेगळ्या विश्वात । रममान होणं
चिंता न करणं । कुणाचीही ॥ ६
मन आवरण । कामात गुंतण
स्वतः सावरणं । अशावेळी ॥ ७
दीपककुमार सरदार
ता. लोणार जिल्हा बुलढाणा
=======
0
4
8
2
9
7



