सिर्सी येथे ऑनलाईन जुगारात हरल्याने घरीच केली चोरी
आधी पण बापाला टोपी देत केले होते बापाचे अकाऊंट खाली
सिर्सी येथे ऑनलाईन जुगारात हरल्याने घरीच केली चोरी
आधी पण बापाला टोपी देत केले होते बापाचे अकाऊंट खाली
नवे – नवखे मुलांना कमी वेळात जास्त पैसे कमवायचे अजब अट्रॅशन
प्रतिनिधी :- अखिल रोडे
नागपूर/ सिर्सी: टीव्ही, मोबाईल वर सतत दिसणाऱ्या जाहिराती त्याही ऑनलाईन जुगार, जगली रमी कधी काही तर कधी काही अश्या अनेक जुगार जाहिराती टीव्ही , मोबाईल वर सुरू असतात. त्या जाहिरातीत नामवंत सिने कलाकार , क्रिकेट पट्टु यांना समावेश असल्यामुळे ऑनलाइन सट्ट्याचे क्रेझ वाढत जातय.
अश्याच जाहिरातीतील क्रिकेट प्रेमिला आयडीयल मानत सिर्सी येथिल हर्ष अविनाश निखार हा युवक ऑनलाईन जुगार खेळायला लागला.सुरवातीला त्याला त्यातून चांगला मुनाफा मिळायचा त्यात त्याने जादा पैसे कमवण्याच्या नादात वडिलाचे बँक अकाऊंट मोबाईल मध्ये सुरू करून ऑनलाईन व्यवहार करायचा.या गावातील पुन्हा ३,४ युवकांना अश्याच ऑलाइनवरील सट्टा खेळाचा नाद आहे अशी गावात चर्चा रंगत आहे.
दिनांक ५/२/२०२५ रोजी फिर्यादी अविनाश महादेव निखार यांच्या प्राथमिक रीपोर्ट नुसार ७०,००० रुपये सोने व दागिने चोरी गेल्याचे सांगण्यात आले. या नुसार सिर्सि पोलिस चौकी येथे अज्ञात आरोपी विरोधात गुन्ह्याची नोंद करत बेला पोलिस स्टेशन चे पोलिस कर्मचारी निलेश बिजवाड व अमोल कोटेवार यांनी फॉरेन्सिक व्हॅन आणि डॉगस्कोड यांच्या मदतीने चोरी झालेल्या जागेवरील पंचा समक्ष फिंगरप्रिंट घेण्यात आले. चोरी करणारा कुणी घरचाच आहे असे त्यावरून निष्पन्न झाले. फिर्यादी यांच्या मुलाला ऑनलाईन जुगार खेळन्याचा नाद आहे.
पो.ह.निलेश बिजवाड व पोलिस नायक अमोल कोटेवार यांनी पोलिसी खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता हर्ष निखार यांनी ऑनलाईन जुगार हरल्यामुळे घरीच चोरी केल्याचे कबूल केले. ही कारवाई अपराध क्र ३३/२५ कलम ३०५ (अ ) भा. न्या. स. कायदा अन्वये पोलिस स्टेशन बेला येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.सरदरची कारवाई श्री.हर्ष पोद्दार पोलिस अधिक्षक नागपूर ग्रामीण , रमेश धुमाळ अप्पर पोलिस अधिक्षक नागपूर ग्रामीण, श्री दिपक अग्रवाल सहा. पोलिस अधिक्षक नागपूर, सी. बी.चौहान ठाणेदार बेला पोलिस स्टेशन, पो.उप.नी खंडेराव बोळगिर, पो.हवा. निलेश बिजवाड, दारासिंग राठोड, अमोल कोटेवार, पंकज कोहाड , प्रविण नैनवार, अविनाश उप्परे यांनी केली.
या ऑनलाईन जुगारात गावातील ३,४ युवक जुळून असल्याची चर्चा गावात होत आहे.समोरचा तपास सिर्सि पोलिस चौकीचे चौकी इन्चार्ज निलेश बिजवाड सोबत अमोल कोटेवार , अमोल काळे करीत आहे.



