छत्रपती संभाजीनगरच्या आ. कृ. वाघमारे प्रशालेत छात्रसेवाकालाचा स्नेहपूर्ण समारोप
वसुधा नाईक, प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगरच्या आ. कृ. वाघमारे प्रशालेत छात्रसेवाकालाचा स्नेहपूर्ण समारोप
अध्यापनाच्या अनुभवातून शिक्षकत्वाकडे वाटचाल
वसुधा नाईक, प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, (दि १०) : शासकीय अध्यापक महाविद्यालय आय. ए. एस. ई. छत्रपती संभाजीनगर अंतर्गत आ. कृ. वाघमारे प्रशालेत आयोजित दोन महिन्यांच्या छात्रसेवाकालाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
छात्रसेवाकाल दरम्यान छात्र अध्यापकांना पाठनियोजन, अध्यापन तंत्रे, वर्गव्यवस्थापन तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकविण्याचा अनुभव मिळाला. या प्रशिक्षणामुळे भावी शिक्षकांना अध्यापन कौशल्ये विकसित करण्याची संधी प्राप्त झाली.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. डी.एम.हाके होते. गटप्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ.वनिता रामटेके, मेंटॉर टीचर श्रीमती व्ही.एस.कुलकर्णी तसेच प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी छात्र अध्यापकांच्या वतीने प्रशालेला स्नेहभेट वस्तू देण्यात आली. छात्र मुख्याध्यापक रामेश्वर विभुते यांनी प्रशिक्षणातील अनुभव कथन केले, तर गटप्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ.वनिता रामटेके यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. डी.एम.हाके यांनी अध्यक्षीय भाषणातून प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहीत बनकर, प्रास्ताविक स्वाती राऊत आणि आभार प्रदर्शन सीमा दिवेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छात्र अध्यापक चंद्रकांत तायडे,प्रवीण साळवे, महावीर ताठे, आरती देवकाते यांनी विशेष परिश्रम घेतले.



