Breaking
ई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

विश्वास

दिपककुमार सरदार

0 4 8 2 9 0

विश्वास

स्वार्थाच्या या दुनियेत
विश्वास कुणावर धरावा
माणुसकी शोधण्याचा
प्रयत्न कसा करावा.

पैशाला आले महत्व
माणसे कठोर बनली
झटपट श्रीमंत होण्यासाठी
संपत्तीच्या मागे लागली.

विश्वासच राहीला नाही
जगणे कठीण झाले
धकाधकीच्या युगात
शब्दाचे महत्व विसरले.

कुणी कुणावर आता
ठेवत नाही भरोसा
शोधतेय मन माझे
कसा देऊ मी दिलासा.

मानवाची जात अशी
पहा बदलत गेली
पैशापुढे सर्व जनता
हतबल ती झाली.

कुणालाही सुटेना
पैशाची ती हाव
पैशामागे धावती
पुढेच त्यांची धाव.

दिपककुमार सरदार
ता.लोणार जिल्हा बुलढाणा
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे