0
4
8
2
9
0
परीसस्पर्श
नैराश्याच्या खोल गर्तेत
फसलो होतो मी जेव्हा
धूसर झाल्या होत्या वाटा
पुढे आड नी मागे विहीर
काळोख दाटला भयाण
शेवटची रात्रच ती जणू
फसगत झाली अलगद
अडकलो मी जाळ्यात
अश्रुंचा महापूर डोळ्यात
स्वप्न पडल्यागत तेव्हा
संपर्क साधलास तूच
संवाद तुझा आपुलकीचा
काळजालाही हलवलेस
निराश याच मनामध्ये
आशेचा किरण जागवून
गुलाब हृदयी फुलवलेस
पहिला तुझा परीसस्पर्श
मनोमनी झाला गं हर्ष
तुझ्या परीसस्पर्शाने मी
अंर्तबाह्य मी बदललो
म्हणूनच प्राणप्रिये…
परीसस्पर्श तुझा ऊबदार
जीवनात भरून गेला रंग
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
==========
0
4
8
2
9
0



