0
4
8
2
9
0
सावित्रीच्या लेकी
अज्ञान आणि अंधश्रद्धेने
खितपत पडला समाज सारा
उच्चवर्णीयांचा पगडा भारी
कोसोदूर शिक्षणाचा वारा
क्रांती करण्या उगवला क्रांतीसूर्य
घेऊन वसा बहुजनांच्या शिक्षणाचा
अडवला तिथे भिडला निर्भिड
पाठींबा खंबीर क्रांतीज्योतीचा
क्रांतीची पेटती मशाल ती
शिक्षणाची तेवती ज्योत ती
क्रांतीसूर्याची क्रांतीज्योती
बहुजनांच्या लेकीची पणती
अज्ञान अंधारी जीवनात
दाविला मार्ग शिक्षणाचा
आम्ही सावित्रीच्या लेकी
चालवतो वारसा सावित्रींचा
नाही क्षेत्र असे उणे कोणते
रोवला नाही हो आम्ही ठसा
मक्तेदारी मोडीतच काढली
पुरुषी मनोवृत्तीचा तो फासा
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
=========
0
4
8
2
9
0



