मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय क्रीडा दिन व महावाचन उत्सवाचे आयोजन
तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी
मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय क्रीडा दिन व महावाचन उत्सवाचे आयोजन
विद्यार्थ्यांनी केले आपल्या आवडत्या पुस्तकांचे वाचन
तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी
गोंदिया: भारतीय हॉकीचे बादशाह मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल तथा सायन्स जुनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रा.राकेश उंदीरवाडे, प्रा.तारका रुखमोडे , प्रा.सुरज मोटघरे, अध्यापिका हिना लांजेवार यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
मुलांमध्ये क्रीडा संस्कृती वाढीस लागावी म्हणून शाळेच्या मैदानावर विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांसाठी म्युझिकल चेअर, बॅलेंसिंग गेम, स्किपिंग, लगोरी , रनिंग, गोळाफेक , जैवलीन थ्रो हे खेळ खेळले गेले.
नर्सरी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचा यात उत्स्फूर्त सहभाग होता. राकेश उंदिरवाडे यांनी आपल्या मनोगतातून मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल मार्गदर्शन केले.खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो ,निर्णय क्षमता, सहानुभूती शिस्त आणि सहकार्याची भावना निर्माण होते आणि या गुणांच्या बळावर व्यक्ती कोणतीही कार्य करण्यास सक्षम होतो .हे मोलाचे विचार त्यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले.
तसेच याच शुभ पर्वावर महावाचन उपक्रमही घेण्यात आला. वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे, वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते.वाचनाद्वारे सर्जनशीलता वाढते, विचारांची क्षितिजे विस्तारित होतात म्हणून विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करावे याउद्देशाने शाळेत महावाचन उत्सव 2024 उपक्रम राबविण्यात आला .तिसरी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या पुस्तकांचे वाचन केले .त्यासोबतच वाचलेल्या पुस्तकावरील सुंदर तथा समीक्षात्मक अभिप्राय विद्यार्थ्यांनी लिहून काढले.त्यासाठी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.



