0
4
8
2
9
3
मनधरणी…
विचार न करता घेतली
टोकाची भूमिका तुम्ही
होऊन भिन्न जना दाखवले
किती नाटकं बघावी आम्ही..
तुतू मैंमैं शिगेला पोहोचवून
जगासमोर निंदनीय ते कर्म
अक्कलशून्य बनवून आम्हा
दाखवण्यापुरता खोटाचं वर्म..
स्वस्वार्थासचं देऊन प्राधान्य
तोडलीत कितीजणांची मनं
कित्येकांनी केली मनधरणी
बदललीत सतराशेसाठ गणं..
कसं, का?कळलं नाही स्वहित
वेळेचा झाला तमाशा असाकाही
तेव्हा कुठे आता अक्कल आली
करून मनधरणी एकत्र येऊ पाही..
झाले ते भले झाले असे म्हणून
केली हातात हात घेत मिळवणी
नका भांडू आपापसात आता पुन्हा
नाहीतर समाज देईल चिथावणी..
प्रज्ञा सवदत्ती
गोरेगाव-रायगड.
==========
0
4
8
2
9
3



