आंदोलन
आपल्या न्याय हक्कासाठी
आंदोलन करायचे आहे,
सामूहिक एकत्र येऊन
आपली एकी दाखवायची आहे.
राजकीय,अराजकता
दिवसोंदिवस, वाढत आहे,
हक्क,मागताना पाहून,
भिकारी सुद्धा हसत आहे.
मुके बहिरे सरकार
सोंग घेतेय सारखे
बिंग त्यांचे फोडू
भाऊ भाऊ, सख्खे.
भीक नको हक्क मागू
आंदोलन करू आम्ही
संविधानिक मार्गाने
मागण्या मांडू आम्ही.
स्वातंत्र्य समता, आणि लोकशाही
राहू नये फक्त, नावापूरती
लिलाव=आंदोलन*
लेखणीने बाबासाहेबांच्या
दिले हक्क आणि अधिकार
अन्यायाविरुद्ध लढण्याचा
करावा एकजुटीने प्रतिकार
का म्हणून हिरावून घ्यावे
स्वातंत्र्य जनताजनार्दनांचे
आंदोलन करुन तोडतील
जुलमी पाश गुलामगिरींचे
हे बंद मोर्चे संप नि हडताळ
मुस्कटदाबीविरुद्धचा एल्गार
मागती जर सनदशीर मार्गाने
शासनदरबारी व्हावा विचार
लोकशाहीच्या वल्गना फुकाच्या
बेबंदशाहीने स्तोम माजवले
आंदोलनाच्या या माध्यमातून
भलेभलेही वठणीवरच आले
आंदोलन हा हक्क जरी आपला
जबाबदारीचेही भान असावे
अवलंबावा लोकशाही मार्ग
हिंसक वृत्तीचे वळण नसावे
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड



