Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजीनगरमराठवाडासाहित्यगंध

सत्य

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 6 2 9 2 1

सत्य

सत्य गंगेहून निर्मळ
सत्य शिवाहून सुंदर
सत्यच निर्भय निश्चल
सत्यच साक्षात ईश्वर..//

सूर्य प्रकाशा इतकेच
सत्यही स्वच्छ असते
संशयाचे धुके त्याला
झाकूच शकत नसते.. //

कठोर अग्नि परीक्षा
सत्य सदा देत असते
परेशान झाले तरीही
पराजित होत नसते.. //

सत्य हाच खरा स्वर्ग
सत्य हाच श्रेष्ठ धर्म
सत्य हेच चारी धाम
सत्यच खरे पुण्यकर्म.. //

सत्य ठेवी ताठ मान
सत्य सत्कर्मी सन्मान
सत्य मनोबल महान
सत्य सार्थ अभिमान.. //

विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 2 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे