बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗*
*🥀विषय : पेटवू यशाली🥀*
*🍂बुधवार : ०६ / ०८ /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*पेटवू मशाली*
विचारांच्या निखाऱ्यांची धग
विझू विझू पाहताना…
अन्यायाच्या ओल्या जखमांवर
बधिरतेची खपली चढताना…
विषमतेच्या धरतीवर
विद्रोहाची प्रकाश बिजे पेरताना…
पेटवू मशाली…. क्रांतीच्या!
अमानुषतेच्या अधमांना
पेटविण्यासाठी….
समता, न्यायाच्या इच्छांना
चेतवण्यासाठी…
भ्रामक कुसमजुतींना
मिटविण्यासाठी…
पेटवू मशाली…. सुविचारांच्या!
नीचेतेने कुस्करलेल्या कळ्यांच्या
सोशिकतेच्या वेदीवरती जळणाऱ्यांच्या
स्वातंत्र्यासाठी…
कुठे, युद्ध अन् भूकबळी
कुठे, फास पोशिंद्याच्या गळी
भीतीच्या अंधारावर प्रकाश फेकण्या
पेटवू मशाली…. शांतीच्या!
*स्वाती लभाने, वर्धा*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🌈🔥♾️♾️♾️♾️
*पेटवू मशाली*
आयुष्याच्या पेटवु मशाली
देशसेवेचे दीप उजळवू
प्रकाशमान करू आयुष्य
पदरी पुण्य प्राप्ती मिळवू ॥१॥
आप्तांशी संवाद साधून
मनांतील सल मोकळा करू
सुखद गतस्मृतींना आठवून
जीवन आपले आनंदीत करू ॥२॥
जगणे सत्कारणी लावूनी
माणूसकीचे व्रत घेऊनी
गरजूंना मदत करूनी
आपण दावू यशस्वी होवूनी ॥३॥
शरीर आमचे थकले तरी
प्रबळ जिद्द ठेवूनी अंतरी
समाधानाच्या पेटवू मशाली
मृदु मुलायम भाषा ठेवून उरी ॥४॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🌈🔥♾️♾️♾️♾️
*पेटवू मशाली*
जग आकुंचित, मन संकुचित, विज्ञानयुग आले
स्वयंचलित, संस्कार पतित, फक्त सज्ञान झाले.
अचाट विद्वत्ता, नसेच नम्रता, ते ज्ञान वाया गेले
अमाप धनवान,नसे दयावान, दान नाहीच केले.
माझा मीच सर्व, हाच गर्व, सत्कर्मावीण वंचित
ना जाणे वर्म, ना माने धर्म, गाठी नसेच संचित..
नसे टिकावू, केवळ दिखावू, झाली नाती गोती
देह बिलगले, मन दुभंगले, बनली प्रवृत्ती कोती.
अर्थ प्रलोभन, व्यर्थ प्रबोधन, भुले मिथ्या माया
मागे मागे पळा, मृगजळा, गेली झिजूनी काया..
होईना भक्ती, साधेना मुक्ती, कशी मिटेल भ्रांती
ना घेई शोध, ना होई बोध, कशात आत्मशांती..
युक्ती प्रयुक्ती, जागवू व्यक्ती, घडवू भारत नवा
सशक्त संतती, राष्ट्र संपत्ती, बदलू प्रत्येक युवा..
कणाकणात, मनामनात, चला चेतवू खुशाली
सुसंवाद हेतू, बांधूया सेतू, आता पेटवू मशाली..
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🌈🔥♾️♾️♾️♾️
*पेटवू मशाली*
आली संकटे अंगावरी
हजारो अशी चालूनी
काळ्या कभिन्न अंधाराच्या
हातामध्ये हात घालूनी
तरी कशाला डगमगसी
अडखळसी तू कशाला?
आव्हानांना देई उत्तर
जागृत करून अस्मितेला
किती अन्याय होती
या दीन दुबळ्यांवरी
किती निर्भया कोवळ्या
नराधम हे चुरगाळती
असत्याच्या या बाजारी
सत्याची लागते बोली
सत्तेसाठी हपापलेली
नेतेमंडळी जाती विकली
लाचखोरी,सट्टेबाजीची
असे हो कमान वाढती
हुंड्यासाठी जीवा मुकती
विवाहिता निष्पाप किती!
पापाच्या जाळाया राशी
पेटवू स्वतेजाच्या मशाली
अभंग,अक्षय शांतीसाठी
भरुया ज्ञानाच्या पखाली
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🌈🔥♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*पेटवू मशाली*
अंतर्मन सांगे मजला
मीच खरी वैभवशाली
कोटी संपत्ती नसेल जरी
वाटे मी तर भाग्यशाली ॥
गोंडस ती चेहरे दिसता
हरपतो सारा ताण
भविष्यास त्यांच्या आकार देण्या
करावे जीवन सारे अर्पण ॥
आनंददायी शिक्षण देऊनी
आणूया शिक्षणप्रवाहात
अध्ययन निष्पत्ती साध्य करण्या
चला झटूया दिनरात ॥
कृतीयुक्त शिक्षण देऊनी
सक्षम बालक घडवूया
सुजाण नागरिक या देशाला
शिक्षक होऊनी देऊया ॥
संस्काराचे सिंचन करूनी
जीवनात भरूया खुशाली
साक्षरतेचा प्रकाश करण्या
ज्ञानदानाच्या पेटवू मशाली ॥
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🌈🔥♾️♾️♾️♾️
*पेटवू मशाली*
अज्ञानाच्या काळोखात
जगतो शेतकरी माझा,
पेटवू मशाली ज्ञानाच्या
वाचेल शेतकरी माझा.
लुटतो सावकार फायदा
त्याच्या त्या साधेपणाचा,
दलाल-व्यापारी लुटती
मालास भाव अल्पदराचा.
गगनास भिडले भाव
बियाणे, औषधं, खतांचे,
आत्महत्येचे कारण बनले
कर्जबाजारी होण्याचे.
मजूर मिळत नाहीत
शेती मशागत करायला,
काढणीस माल येता
निसर्ग छळतो त्याला.
या साऱ्या शेतकऱ्यांचे
अस्तित्व टिकविण्याला,
पेटवू मशाली कृषीप्रधान
ठेवण्या या देशाला!
*डॉ. बालाजी राजूरकर*
*हिंगणघाट जि. वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🌈🔥♾️♾️♾️♾️
*पेटवू मशाली*
तेजाकडून तिमिराकडे प्रवास माझा
असा अंधार यात्री मी युगांचा
पेटवतोय चिता अग्नीचे टेंभे,
मशाली प्रकाशितांसाठीच आजवर….
पिढीजात धंदाच माझा
पिढ्यांनी पत्करली रुढींची गुलामी
स्मशानीच चाले संसार माझा
असा राखणदार मी स्मशानाचा….
चीतेच्या प्रकाशा शिवाय
न होई उदरभरण माझे
रोज अंतयांत्रेची पाहे वाट
दगड झाल्या भावना, असा जगण्याचा घाट…
खूप झाले मरून जगणे आता
पेटवू मशाली ज्ञानाच्या,परिवर्तनाच्या
ठरणार शेवटचा प्रतिनिधी मी
माझ्याच पिढ्यांचा…
मोडून बहिष्कृत जगणं
पेटवून मशाल शोधतोय
तेज प्रकाश प्रगतीचा
समाजशीलतेचा…..
आत्ता माझा प्रवास
तिमिरातून तेजाकडे
माणूस म्हणून जगण्याकडे…
माणूस म्हणून जगण्याकडे..
*सौ सुरेखा कोरे,नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
♾️♾️♾️♾️🔥🌈🔥♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



