0
4
8
2
9
0
झेप
संपादन करण्यास
यश झेप घ्यावी लागे,
एकवटून ताकद,
हिम्मत असावी लागे.
विचार सोडून मागे,
बघावं पुढेच लागे,
ध्येय ठेऊन उराशी,
मार्ग चालावा लागे.
झेप घेण्यास विश्वास,
स्वतःवर ठेवशील;
नको घेऊ रे आसरा,
घातास बळी होशील.
परिश्रम करण्यास,
नकोस घाबरशील;
तेव्हाच झेप घेण्यास,
पात्र तुला करतील.
जाशील जिथे कुठे,
तू प्रथम यायचं आहे;
आठवणीत सर्वांच्या,
सदा राहायचं आहे.
डॉ. बालाजी राजुरकर
हिंगणघाट, वर्धा
========
0
4
8
2
9
0



