कवितानागपूरनांदेडमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
पाऊस; प्रकाश गोधने
0
4
8
3
0
0
पाऊस
कृष्ण धवल सावळ
नभ ओथंबून आले
गार हवेच्या स्पर्शाने
कन मातीचे मोहरून गेले
थरथर झरझर थेंब बरसले
आत धरतीत रुजत गेले
मातीचा गंध हवेत
आसमंत दरवळून गेले
पिवळ्या कोवळ्या उन्हात
इंद्रधनु रंगात रंगुन गेले
रंगीबेरंगी फुलपाखरे
आनंदात दंगून गेले
हळदीच्या अंगाने दारि
चिमण्यांचे थवे आले
अंगणी ईवल्या तळ्यात
अंघोळ करून गेले
झाडाच्या गर्द पानास
नववधूचे रूप आले
पानास बिलगला थेंब
थेंबाचे दव झाले
एक पाखरू चिंब ओले
हिरवे होऊन आले
नजर बावरी चोर पावली
मज मोहित करून गेले
प्रकाश पुंडलिक गोधने
बाचोटीकर ता.कंधार जि.नांदेड
===========
0
4
8
3
0
0



