0
4
8
2
8
4
तू अन् मी
तू धरा
मी झरा खळाळणारा
तू आकाश
मी पक्षी झेपावणारा
तू निसर्ग
मी पसरलेली हिरवळ
तू डोंगरमाथा
मी सरीता अवखळ
तू भाषा
मी शब्द भावनांचे
तू आशा
मी स्वप्न जागेपणाचे
तू विश्व
मी अस्तित्व जीवनाचे
तू जीवन
मी लक्ष्य जगण्याचे
तू संगीत
मी गीत मधूर ओठांचे
तू प्रेम
मी विश्व तुझ्या ह्दयाचे
शर्मिला देशमुख -घुमरे
ता. केज जि. बीड
========
0
4
8
2
8
4



